स्वतःच्या आईला जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यात आरोपी रवींद्र सोरप ला 5 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : स्वतःच्या आईचा खून करणाऱ्या रवींद्र रामचंद्र सोरप (वय 45, रा. वारगाव, ता. कणकवली) याला कणकवली न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी रवींद्र याने आपल्या 80 वर्षीय वृद्ध आईचा वारगाव येथील राहत्या घरात बुधवार रात्री साडे अकरा वाजता कोयत्याने वार करून खून केला होता. घटनास्थळावरून आरोपी रवींद्र याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी आज आरोपी रवींद्र याला कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश शुभम लटुरिया यांनी 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

error: Content is protected !!