कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशन तर्फे जिल्हाअध्यक्षा प्राची शिंदे यांचा केला सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाअध्यक्षा प्राची प्रमोद शिंदे यांचा कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशन तर्फे सामाजिक कार्यकत्या आदर्श गौरव सत्कार करण्यात आला. प्राची शिंदे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक कार्यात प्रथम अग्रेसर पुढाकार घेऊन बरेच प्रश्न मार्गी लावण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच त्यांना सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी,गोकुळचे अध्यक्ष विश्वास जाधव,ऍड.धनंजय पठाडे माजी महापौर आजरेकर, राजू माने यांच्या हस्ते त्यांना श्रीफळ प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमामध्ये प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

error: Content is protected !!