वैभववाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धेत विद्या मंदिर आखवणे नंबर एक या शाळेने उज्वल यश संपादन केले आहे. निबंध स्पर्धेत इयत्ता तिसरी ते पाचवी स्वामिनी संजय पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर इयत्ता सहावी ते आठवी या गटातून समर्थ संदीप गोरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते दुसरी या गटातून दिव्या सुनील गिरकर यांनी द्वितीय तर इयत्ता सहावी ते आठवी या गटात सानवी संतोष नागप हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांना प्रशाळेचे मुख्याध्यापक अस्लम पाटणकर, सहाय्यक शिक्षक संतोष नागप, जोशना पाटील, वर्षा पडूळ यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पांचाळ व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यामंदिर आखवणे नंबर एक शाळेचे उज्वल यश












