सर्वाधिक खेळाडूंची चमकदार कामगिरी
तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय सिंधुदुर्ग व विद्यामंदिर हायस्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील एच. पी. सी. एल. सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय फेंसिन्ग (तलवारबाजी) स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिले आहे. या विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत:
फोईल 14 वर्षे मुले –
झयान काझी – प्रथम क्रमांक
अयान काझी – द्वितीय क्रमांक
इपी – अवधूत शिंदे, प्रतीक जाधव तृतीय क्रमांक
सेबर – साहिल अडुळकर – प्रथम क्रमांक, भार्गव गुळेकर – द्वितीय क्रमांक
14 वर्षे मुली –
फॉईल शुभ्रा चिके – प्रथम क्रमांक, रुद्रा कर्ले – तृतीय क्रमांक
इपी – जिया तळगावकर – प्रथम क्रमांक, कांचन अडुळकर – तृतीय क्रमांक
सेबर – देविका माळकर – प्रथम क्रमांक, आराध्या पाटणकर – द्वितीय क्रमांक
17 वर्षे मुले –
फॉईल – अरफात चौगुले – प्रथम क्रमांक, तरेश तूरळकर – द्वितीय क्रमांक
इपी – प्रथमेश अडुळकर – प्रथम क्रमांक, उझेर मुकादम – तृतीय क्रमांक
सेबर – मोहम्मद सारंग – प्रथम क्रमांक, प्रद्युम्न स्वामी – तृतीय क्रमांक
17 वर्षे मुली –
फॉईल – नाबिहा काझी – प्रथम क्रमांक
इपी – माही दयानी – तृतीय क्रमांक
सेबर – मदिहा सातकूट
अलमास मुकादम – तृतीय क्रमांक
या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून सर्व विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय फेंसिन्ग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशाळेचे क्रीडा शिक्षक एकनाथ धनवटे व प्रथमेश मन्यार यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेचे अध्यक्ष मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, सेक्रेटरी मोहन कावळे, सहसचिव राजेंद्र ब्रम्हदंडे, खजिनदार परवेज पटेल तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका निलम डांगे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












