काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा – तौफिक मुल्लानी

वैभववाडी (प्रतिनिधी) : काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे. या पक्षाला मोठी परंपरा आहे. काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळविण्यासाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवे. प्रत्येक गावात ग्राम कमिटी स्थापन करून जोमाने कामाला लागा. काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी तौफिक मुल्लानी यांनी दिली. कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी मौलानी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाचा दौरा केला. वैभवाडी राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयात आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुल्लानी बोलत होते.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरे, तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, दादा नेवरेकर, बाळा पांचाळ, प्रभाकर ईश्वरकर, बोबडे, अनंत पवार, मुस्तफिन पाटणकर, शशिकांत वळंजू, सचिन देसाई, शितल नेवरेकर, अविनाश मोहिते, सिद्धार्थ कांबळे, रमेश देवरुखकर, किशोर जाधव, दिलीप राणे, दिलदार पाटणकर, संतोष जाधव आदी तालुका काँग्रेस कार्यकारिणीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुल्लानी यांनी वैभववाडी तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिकांचा आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारख्या प्रश्नांवर काम करून घराघरात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष पोहोचवण्याची तुमची आणि माझी जबाबदारी असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!