वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण येथे सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात ९१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणसिंह पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक अनिल घुगे, माजी सरपंच आकाराम, डॉ.जगन्नाथ जामदार, आर्या कांबळे, स्मिता नागप, पोलीस पाटील यशवंत नागप, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती कांबळे, ज्येष्ठ शा. गो. नागप, सुनील पडीलकर, मुख्याध्यापक अस्लम पाटणकर, संतोष नागप, बबन जाधव, अंगणवाडी सेविका वैशाली कदम, श्रुती नागप, मनोज नागप यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
यावेळी रक्तदाब, मधुमेह तसेच कर्करोग तपासणी, रक्त तपासणी, क्षयरोग तपासणी तसेच मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री माता वंदना योजना नोंदणी, आयुष्यमान वय वंदना कार्ड, सिकल सेल कार्ड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या शिबिरामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक घट्टे, डॉ. अनुराधा वावरे, डॉ. सुदर्शन साखरे, डॉ. ज्ञानदेव लोंढे, डॉ. संध्या नरवाडे, डॉ. कीर्ती गायकवाड यांनी नागरिकांची तपासणी केली. त्यांना श्री आरोग्य केंद्र उंबर्डेचे सुपरवायझर रूपाली पावसकर, आरोग्यसेविका ताई देशमुख, आ. सेवक, कुणाल चव्हाण, गट प्रवर्तक पुष्पल शेलार, आशा स्वयंसेविका रुचिता कांबळे, समीक्षा मोरे यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभय कांबळे यांनी मानले.












