मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर नव्याने बांधलेल्या एस. टी. बस स्टॉपला कुरंगवणे मांजरेकरवाडी असे नाव देण्याची ग्रामस्थांची मागणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथून कुरंगवणे मांजरेकरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून बांधण्यात आलेल्या एस. टी. बस स्टॉपला कुरंगवणे मांजरेकरवाडी बस स्टॉप असे नाव देण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थानी हायवे प्राधिकरणाकडे नुकतीच केली आहे.

याबाबत गेली अनेक वर्षे मार्गावरून मांजरेकरवाडी कडे जाणाऱ्या रसत्याला कुरंगवणे मांजरेकर वाडी बस थांबा देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात होती. अखेर महामार्गावर नव्याने एस. टी. बस थांबा बांधण्यात आला असून या आर. सी. सी. बस स्टॉपला कुरंगवणे मांजरेकरवाडी असे नाव देण्यात यावे अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

तर या वाडीकडे जाणारा रस्ता हा सन १९९५ मध्ये माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या निधीतून बांधण्यात आला होता. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी उर्वरित डांबरीकरण करण्याचे काम आपल्या निधीतून केले आहे. सदरच्या रस्त्या लगदच्या बस स्टॉपला कुरंगवणे मांजरेकरवाडी असा फलक लावण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या खारेपाटण विभागात ग्रामस्थांच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती कुरंगवणे मांजरेकरवाडी येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मांजरेकर यांनी दिली.

error: Content is protected !!