कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आज कणकवलीचे माजी सभापती व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, दत्ता काटे, कळसुली सरपंच सचिन पारधीये, राजू हीर्लेकर आदी उपस्थित होते.
कणकवलीचे नवनिर्वाचित प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे भाजपाच्या वतीने स्वागत












