कर्ज फेडा, अफवांवरती विश्वास ठेवू नका

ग्रामीण कुटटा देवगड संस्थेमार्फत कर्जदार महिलांना आवाहन

देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यामधील ग्रामीण कुटटा या संस्थेच्या वतीने देण्यात येणारी महिलांना कर्जे हि परतफेडीची कर्ज प्रकरणे आहेत. यामुळे काहि लोकप्रतिनिधींनी सदर ग्रामीण कुटटा संस्थेमधून घेतलेली कर्जे परतफेड करु नका अशी अफवा व सदर कर्जावू महिलांना एकत्रित करुन चुकिची माहिती देत आहेत. तरी सदर संस्थेच्या कर्जदार महिलांनी अश्या अफवांवरती विश्वास ठेवू नका असे आवाहन ग्रामीण कुटटा देवगड या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. देवगड तालुक्यामध्ये काहि वर्षापासुन ग्रामीण कुटटा या संस्थेच्या माध्यमातून महिलांना उदयोग करण्याकरीता कर्ज देत आहेत. यामुळे महिलांची आर्थीक उन्नती उंचावत आहे. काहि कर्जदार महिलांनी देवगड ग्रामीण कुटटा या संस्थेमधून कर्ज घेवून एका खाजगी कंपनीमध्ये गुंतवणुक केली आहे. व सदरची खाजगी कंपनी बंद पडली आहे. यामुळे या संस्थेतील कर्जदार महिला काहि पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेवून आपण कर्जफेड परत करीत नसणार असल्याचे ग्रामीण कुटटा संस्थेच्या अधिका-यांना सांगत आहेत. देवगड ग्रामीण कुटटा या संस्थेच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठा करण्यात आला तो उदयोग करण्यासाठी खाजगी कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यासाठी ग्रामीण कुटटाच्या अधिका-यांनी सांगिलेले नाही. जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या उददेशाने या महिलांनी खाजगी कंपनीमध्ये गुंवणुक केली होती व सदर कंपनी आता बंद पडली आहे. तरी देवगड ग्रामीण कुटटा या संस्थेमधून कर्ज घेतलेल्या महिलांनी संस्थेच्या नियमांनुसार कर्जाची परतफेड करणे कर्जदार महिलांना बंधनकारक राहणार आहे. ग्रामीण कुटटा संस्था अडचणीत येण्यासाठी जे काहि पक्षाचे पदाधिकारी कर्ज न फेडण्याची अफवा परसवित याला कर्जदार महिलांनी बळी पडू नका असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाव्दारे देवगड ग्रामीण कुटटा संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!