फोंडा-वैभववाडी मार्गावर कोसळलेले झाड स्थानिकांनी केले दूर

वाहतूक केली सुरळीत

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट-वैभववाडी या राज्यमार्गावर लोरे नं. 2 गावात 21 सप्टेंबर रोजी झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. लोरे नं. 2 गावातील स्थानिक ग्रामस्थ दिलीप मांजलकर, गुरू डोंगरे, चंद्रकांत नावले, महेश कदम, दिलीप तर्फे, गणेश मांजलकर यांनी वुड कटर आणि कोयत्याने रस्त्यावर पडलेले झाड तोडून रस्त्यावरून दूर केले. त्यामुळे दुतर्फा खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली.

error: Content is protected !!