आचरा (प्रतिनिधी) : वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा यांच्यातर्फे देण्यात येणारा तिसरा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ हा ;पणदूर येथील ‘संविता आश्रम’ तसेच मुंबई, पालघर, गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे महान कार्य करणा-या थोर समाजसेवक संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना जाहिर झाला आहे. दि.२४ सप्टेंबर रोजी होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याचे वितरण पतसंस्था अध्यक्ष मंदार श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
“कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ संविता आश्रमच्या’ संदिप परब यांना जाहिर…!












