कामळेवीर गावात दिवसाढवळ्या घरफोडी; रोख रक्कम, कॅमेरा व मौल्यवान वस्तू लंपास

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील कामळेवीर येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घरफोडीची घटना उघडकीस आली. गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम, कॅमेरा आणि अन्य वस्तू लंपास केल्या. माणगाव येथे फोटो स्टुडिओसाठी गेलेल्या आळवे यांनी घर बंद केले होते, याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली.

सुरुवातीला मागील दरवाजा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, चोरट्यांनी पुढील दरवाजाचे कडी-बॅकेट उघडून घरात प्रवेश केला. आत प्रवेश करून कपाटे फोडून मौल्यवान ऐवज चोरीस नेले. घटनेची माहिती गिरीश आळवे यांनी तातडीने वेंगुर्ला १०० हेल्पलाईनवर व गावच्या पोलीस पाटलांना दिली.

दिवसाढवळ्या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिकांनी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करावा अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!