वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या संतधर पावसामुळे करूळ घाटात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंत्रनेने तातडीने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. करूळ घाटातील दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. वैभववाडी तालुक्यात गेले काही दिवस पावसाची संततदार सुरू आहे.
या पावसाने पुन्हा एकदा करूळ घाटात दरड रस्त्यावर कोसळली. दगड माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला माहिती मिळाल्यानंतर घाटाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या वेल्हाळ कंपनीने जेसिबीच्या साहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.
४ सप्टेंबर रोजी दरड पडल्यामुळे १२ सप्टेंबर पर्यंत करूळ घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तर शुक्रवारी पुन्हा एकदा दरड कोसल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.












