ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या – भालचंद्र जाधव

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई व कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी

वैभववाडी प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे.

तहसीलदार वैभववाडी यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारने अद्यापपर्यंत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नाही. शेतकरी संकटात सापडला असून सरकारने या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारचे कोणतेही पथक अथवा प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात आलेले नाही. ही बाब अत्यंत निषेधार्य आहे, असा आरोप करीत काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यावेळी शशिकांत वळंजू, सिद्धार्थ कांबळे, सिद्धेश सरवणकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!