हेत येथील फोंडके पाटील मराठा समाजाचे मुंबई येथे मोठया उत्साहात दसरा संमेलन

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई स्थित, सकल फोंडके पाटील मराठा समाज हेत यांच्यावतीने डॉ. शिरोडकर हॉल, परेल येथे दसरा संमेलन मोठ्या उत्सहात संपन्न झाले. यावेळी मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते. हेत गावातील फोंडके पाटील समाजाची स्थापना सन १९७० साली झाली आहे. जवळ जवळ ९० टक्के तरुण मंडळी मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यात आहेत. जवळ-जवळ ३०० च्या वरती तरुण व्हॉटसॲप माध्यम आणि फोन संपर्कातून एकत्र येत मौजे हेत, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग गावातील फोंडके पाटील मराठा समाजाचे एकत्रीकरण, समाजातील व गावातील सर्वांचा सर्वांगीण विकास या धोरणातून एकत्र येत दसरा संमेलन केले.

दसरा संमेलनासाठी फोंडके समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौजे हेत गावचे ग्रामदैवत श्रीदेव केदारलिंगप्रती श्रीफळ ठेऊन व आशीर्वाद घेऊन, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात कार्यक्रमाला सुरवात केली. तरुण सदस्यांनी समाजाच्या विकासासाठी व हेत गावच्या उन्नतीसाठीचे आपआपले विचार मांडले.

मुंबई व गावात कार्यरत राहण्यासाठी नवीन कार्यकारिणी स्थापना करण्यात आली, कार्यकारिणीतील नवीन सदस्य यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीस सर्वांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन शुभेच्या दिल्या गेल्या. गावातील सर्वच समाजाला एकत्र घेऊन सकल समाजाची व गावाची उन्नती करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला. सर्व फोंडके मंडळीने एकमेकांची गळाभेट घेत दसऱ्याचे सोने लुटले.

error: Content is protected !!