जिल्ह्यातील नामवंत कलाकारांची मेजवानी ; १५ ऑक्टोबरला राधाकृष्ण हॉलमध्ये नाट्यप्रयोग
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली, देवगड आणि वैभववाडी कलाकार बहुउद्देशीय संघाच्या वतीने कै. प्रशांत मेस्त्री व कै. राजू हर्याण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य पौराणिक दशावतार ‘रावण जन्म अर्थात गोकर्ण महाबळेश्वर’ हा नाट्यप्रयोग बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता राधाकृष्ण हॉल, पोकळे (पेट्रोलपंप शेजारी), फोंडाघाट येथे सादर होणार आहे.
या नाट्यप्रयोगात हार्मोनियमवर अनंत तळेकर, पखवाजावर संदीप मेखी, तर तालरक्षक म्हणून नागेश शिरसाट साथ देणार आहेत. नाट्यप्रयोगात जिल्ह्यातील अनेक नामवंत कलाकार सहभागी होत असून,
महागणपती – साहिल शिरोडकर, रिद्धी-सिद्धी – क्रिश गोसावी, सुमली – गौरेश पांचाळ, नारद – सत्यवान चाळके, कैकशी – कृष्णा परब, इंद्र – गौरव शिंदे, विश्रवा – दिलीप सामंत, शंकर – प्रशांत (गॅरी) कामतेकर, पार्वती – सुरेश गुरव, गणपती – सुहास कानडे, गुराखी – गुरुनाथ मेस्त्री, काकपली – अजित लाड, रंभा – रोहित राणे, रावण – सुंदर (पपू) साटम अशी प्रभावी कलाकारांची फळी रंगमंच गाजवणार आहे.
या नाट्यप्रयोगातून प्रेक्षकांना पौराणिक कथा, संगीत, अभिनय आणि पारंपरिक दशावताराची झलक अनुभवायला मिळणार असून, नाट्यप्रेमींनी या अविस्मरणीय प्रयोगाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












