शिवसेना संघटना बळकटीसाठी,व कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्यासाठी ही बैठक – माजी आमदार राजन तेली

आरक्षण जाहीर होताच शिवसेनेची पहिली बैठक मिठबाव येथे

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी देवगड तालुक्याचा दौरा केला. “आजच आरक्षण जाहीर झालं असून, आजपासूनच शिवसेना संघटना बळकट करण्यास आणि कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्यास आम्ही सुरुवात केली आहे,” असे ते म्हणाले.

राजन तेली यांनी सांगितले की, “जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुका नियोजनपूर्वक लढवण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची पहिली बैठक घेतली आहे. काही आरक्षणांमुळे इच्छुकांना फटका बसला असला तरी योग्य उमेदवार निवडण्यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना बळकट करण्याचे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.”

कुणकेश्वर जिल्हा परिषद गणातील ही बैठक मिठबाव गणेश मंगल कार्यालयात पार पडली. बैठकीस मिठबाव,कातवण,मिठमुंबरी, कुणकेश्वर परिसरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या आदेशानुसार देवगड तालुक्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे यावेळी तालुकाप्रमुख अमोल लोके यांनी सांगितले

या बैठकीत शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली,संदेश पटेल-सावंत, तसेच ग्रामपंचायत सदस्य आशुतोष कातवणकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी तालुकाप्रमुख अमोल लोके,ग्रा प सदस्या सौ अक्षया लोके, दीपक वायंगणकर, मंदार गुरव,प्रकाश मेस्त्री,आबा मयेकर,महेश घाडी,शैलेश मयेकर,कैलास कातवणकर, अनिल लोके,किरण राजम ,आदी सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

देवगड तालुक्यातील विविध पंचायत समिती गणांमध्येही पुढील आठवड्यात संघटनात्मक पूर्वतयारी बैठका घेण्यात येणार असून, प्रत्येक गणात कार्यकर्त्यांची जास्तीत जास्त उपस्थिती असणे अपेक्षित आहे.असेही यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांनी सांगितले.

error: Content is protected !!