सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीच्या दिवाळी क्रिकेट प्रशिक्षणाचे उद्घाटन २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजन परुळेकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाच्या वतीने संस्थापक वासुदेव वरावडेकर, लिजंडसचे मालवण तालुका अध्यक्ष सुशील शेडगे, तालुका उपाध्यक्ष महेश तारी तसेच विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर व ज्ञानेश केळुसकर, सुमन पेडणेकर आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने, संस्थापक वासुदेव वरावडेकर आणि तालुका अध्यक्ष सुशील शेडगे यांनी प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले आणि प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.सिंधुदुर्ग लिजंडस क्रिकेट समूहाच्या वतीने विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीला लेदरबाॅल क्रिकेट बॅट भेट स्वरुपात देण्यात आली.












