परतीच्या पावसामुळे चिंदर परिसरात मोठे नुकसान..!

सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्यात यावी- शेतकरी वर्गातून मागणी

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर परीसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक तसेच नाचणी पीक पाण्याखाली जाऊन कुजले आहे. तर भाताला कोंब आले आहेत. चिंदर, त्रिंबक, आचरा, बांदिवडे, पळसंब भागातील एकरो शेतीची नुकसानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्तांना सरसकट तात्काळ पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कोकणातील शेतकरी नेहमीच मदती पासून वंचित राहिला आहे त्यांच्या प्रश्नांनानसाठी लोक प्रतिनिधी आतातरी उचल घेतील काय? असा प्रश्न सर्वसामान्य माणसातून व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!