कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई शिक्षक साहित्य मंडळ, मुंबई आयोजित यावर्षीच्या “बेस्ट टिचर पुरस्कार ‘व “राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील सन्मान “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना जाहीर झाला आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रविंद्र नाट्ममंदिर प्रभादेवी, मुंबई येथे देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा, विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुप्रसिद्ध अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता जोशी (सराफ) प्रसिद्ध संगीतकार अन्नु मलिक व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक करणार आहे.शशिकांत तांबे यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नाव लौकिकात भर पडणार आहे. शशिकांत तांबे यांच्या या निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून शशिकांत तांबे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे..
शशिकांत तांबे यांना बेस्ट टिचर पुरस्कार जाहीर












