कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष तथा कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावचे सुपुत्र, भिरवंडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेडचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते संजय उर्फ छोटू कदम यांचा 47वा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या हितचिंतक मित्रपरिवाराकडून साजरा करण्यात आला.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते सांगवे – कनेडी येथील भाजपा विभागीय कार्यालयात संजय कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संजय कदम यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विजय भोगटे, सांगवे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, गांधीनगर उपसरपंच मंगेश बोभाटे, डॉ. विनोद सावंत, गुरू सावंत, पपू गावकर, विनय सावंत, यांच्यासह नाटळ सांगवे विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख, सोशल मीडिया प्रमुख, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय कदम यांच्या भिरवंडे येथील निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध चर्मकार संघटनांच्या वतीने कदम यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. 47 दिवे प्रज्वलित करून संजय कदम यांचे औक्षण करण्यात आले. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक राजन चव्हाण, संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे राज्यसचिव प्रसाद मसुरकर, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, युवा संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाघेरकर, दत्तकुमार फोंडेकर, कलमठ ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, सुभाष कदम, प्रवीण कदम, पांडुरंग भंडारी आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.












