माजी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्वाची जबाबदारी निभावल्याबद्दल माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सिंधुदुर्ग जिल्हा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने शाल, स्मृतिचिन्ह देऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

भारताच्या स्वातंत्रोत्तर काळातही अद्यापही वंचीत घटकांतील वाड्या वस्त्या आणि रस्त्यांना जातीवाचक नावे आहेत. मानवतेला लांच्छन असणाऱ्या या घटनेकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित केलेल्या वंचित घटकांच्या जनता दरबारात विशेष लक्ष दिले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत बैठक घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाड्या वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबत शासन अध्यादेश काढला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वाड्या आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांचे ओएसडी तथा माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याबद्दल सर्वगोड यांचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संविधानिक हितकारिणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड महेश परुळेकर, जिल्हा संघटक अंकुश जाधव, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर उपस्थित होते.

error: Content is protected !!