एलसीबी ची मोठी कारवाई

अवैध दारू, कार सह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज (दि. ९ नोव्हेंबर) बांदा पोलिस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली असून दोन आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल १२ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई महामार्गावरील बांदा येथील हॉटेल कावेरी परिसरात करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

  1. आकाश नामदेव खोत (वय २५, रा. सलगरे, जि. सांगली)
  2. विठ्ठल पांडुरंग नाईक (वय ४८, रा. विश्रामबाग, जि. सांगली)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून १० लाख रुपयांची इनोव्हा कार तसेच २ लाख ११ हजार २०० रुपयांची गोवा बनावटीची दारू असा एकूण १२ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, तसेच पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!