मुंबई (प्रतिनिधी) : गाबीत महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, मुंबईच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘गाबीत समाजाचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार रविंद्र फाटक, अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष दिगंबर गांवकर, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, खजिनदार नारायण आडकर, गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष सुजय धूरत, सरचिटणीस बाळा मणचेकर हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गाबीत समाजाचा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन












