वैभववाडीला मिळाला ५५ लाखांचा अग्निशमन बंब

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन

वैभववाडी (प्रतिनिधी) : येथील नगरपंचायतमध्ये ५५ लाख रुपये किमतीचा नवा अग्निशमन बंब दाखल झाला आहे. त्यामुळे आता तालुक्यात त्याचा फायदा होणार आहे, असा दावा नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी केला आहे. शासनाच्या अग्नी सुरक्षा अभिनयाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून हा बंब उपलब्ध करून देण्यात आला. बंबाचे लवकरच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!