त्रिंबक महापुरुष मंदिर येथे 15 नोव्हेंबर रोजी वार्षिक हरिनाम सप्ताह…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक बगाडवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव महापुरुष मंदिर येथे सात प्रहाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त सकाळी श्री देव महापुरुष पाषाणाकडे अभिषेक, विधिवत पूजा, सकाळी 10 वाजता हरिनाम सप्ताहाला सुरुवात तसेच रविवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी हरिनाम सप्ताहाची समाप्ती व दुपारी महाप्रसाद व हरिनाम सप्ताहाची समाप्ती, यावेळी दशक्रोशीतील भजनी मंडळे आपली भजन कला सादर करणार आहेत.

श्री देव महापुरुषाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नवस फेडण्यासाठी केळी अर्पण केली जातात. तरी भाविक भक्तांनी हरीनाम सप्ताहाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!