कणकवली तहसीलदारांना दिले निवेदन
कणकवली ( प्रतिनिधी): कणकवली रेशनकार्ड ऑनलाइन करताना अनेक अडचणी येत असून रेशनकार्ड धारक धान्यापासून वंचित राहत आहेत. अशा रेशनकार्डधारकांना त्वरित धान्यवितरित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांनी तहसीलदार रमेश पवार यांचेकडे केली आहे. ऑनलाइन रेशनकार्ड च्या घोळाचा होत असलेला मनःस्ताप तहसीलदार पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे निलेश गोवेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कथन केला. यावेळी रुपेश जाधव समीर आचरेकर सागर वारंग चंद्रकांत नाईक संदेश मयेकर प्रकाश सावंत देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते. निलेश गोवेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रेशनकार्ड ऑनलाइन करतेवेळी काही रेशनकार्ड धारकांचे रेशनकार्ड रद्द झाले आहेत.त्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही.अंत्योदय योजनेच्या रेशनकार्ड धारकानाही धान्य मिळत नाही.रेशनकार्ड ऑनलाइन करताना एका रेशनकार्ड मध्ये दुसऱ्याच व्यक्तीचे नाव नमूद होत आहे.रेशनकार्ड ऑनलाइन च्या प्रक्रियेमुळे जनता त्रस्त झाली आहे.तरी या रेशनकार्डधारकाना त्वरित धान्य देण्यात यावे अशी मागणी गोवेकर यांनी केली आहे.












