शिवसेनेतर्फे २७ रोजी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता जानवली वायंगवडेवाडी येथे विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजीत केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे १५ हजार १० हजार आणि ७ हजार अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार श्री. सुधीर सावंत यांच्या हस्ते होईल. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दिपक भाई केसरकर उद्योगमंत्री उदयजी सामंत, आमदार रविंद्र फाटक उद्योजक किरण सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी- दामू सावंत : 9404441919 भूषण परुळेकर: 9373893313 महिंद्र सावंत : 9420335758 मारुती सावंत : 9422373213

error: Content is protected !!