आचरेत लक्षवेधी ठरतेय गडकिल्यांचे मखर…!

केळीच्या सोपातून 14 तासांच्या मेहनतीने बनली कलाकृती

श्री स्वामी रामेश्वर मखर सजावट समूहाची कौतुकास्पद कलाकृती

आचरा (विवेक परब) : आदर्श व्यापारी संघटना आचराने आज श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली असून श्री रामेश्वर मखर सजावट समुहाने या सत्यनारायण महापूजेसाठी सलग १४ तास मेहनत घेऊन केळीच्या सोपा पासून हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारली असून हे गडकिल्ल्यांचे मखर लक्षवेधी ठरत असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी याच ठिकाणी या समुहाने अयोध्या राम मंदिर ची प्रतिकृती असलेले मखर साकारली होती. यांची राज्य भरातून समाज माध्यमांनी दखल घेतली होती.

हि प्रतिकृती साकारण्यासाठी रुपेश बागवे, चंदू कदम, हेमंत गोवेकर, प्रशांत सावंत, मुकेश सावंत, समीर गावकर, शैलेश शेट्ये, प्रसाद गुरव, रुपेश पुजारे, राम मिराशी, निलेश पुजारे, प्रकाश परब आणि पराग गोवेकर यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!