रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या वतीने ‘कोकणातील पाणी प्रश्नावर आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळा’ संपन्न

“नवीन पिढीला पाण्याविषयी सजग करणे काळाची गरज…” – सतीश खाडे

खारेपाटण (प्रतिनिधी) : “आज देशातील फक्त १७ ते २४ टक्के जनतेला स्वच्छ पाणी मिळते. तर जगातील ७० टक्के आजार हे फक्त दूषित पाण्यामुळे होत असतात. त्यामुळे आजच्या नवीन पिढीला पाण्याविषयी सजग करणे काळाची गरज असल्याचे भावपूर्ण उदगार जल अभ्यासक व रोट्रियन इंजिनियर सतीश खाडे यांनी खारेपाटण हायस्कूल येथे सिंधुदुर्ग जिल्हा रोटरी परिवार व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “कोकणातील पाणी प्रश्नावर आधारित आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेस” मार्गदर्शन करताना काढले.

खारेपाटण हायस्कूलच्या कै. चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहात रोटरी क्लब खारेपाटण चे अध्यक्ष दयानंद कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जल अभ्यासक व मार्गदर्शक सतीश खाडे यांसह त्यांच्या पत्नी अनामिक खाडे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तथा रोट्रियन संतोष पाटणकर, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे सचिव अजय गुरसाळे, खजिनदार रोट्रियन सारिका महिंद्रे, रोट्रियन सुबोध देसाई, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने सतीश खाडे यांचे प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांच्या शुभहस्ते तर त्यांच्या पत्नी अनामिका खाडे यांचा शाळेच्या शिक्षिका सारिका महिंद्रे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. “माझे पाणी माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभर पाण्याविषयी जनजागृती करणारे जलप्रेमी संतोष खाडे यांचे आज शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे कोकणातील पाणी प्रश्नावर कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थी व नागरिक यांकरिता मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.

कोणातील पाण्याविषयी बोलताना सतीश खाडे म्हणाले “कोकणात जरी प्रचंड पाऊस पडत असला तरी त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. डोंगर दरी झाडी यांधून वाहून जाणाऱ्या पाण्याला आपण थांबवून अप्रत्यक्ष पाण्याचा वापर आपण कमी करून बंधाऱ्यांची संख्या वाढविली पाहिजे व यांच्यातून कोकणाला समृद्ध केले पाहिजे. जर आपल्याला भविष्यात चाले निरोगी जीवन जगायचे असेल तर विषमुक्त हवा, विषमुक्त पाणी आणि विषमुक्त अन्न मिळणे गरजेचे आहे. याकरिता नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

या कार्यशाळेस शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी केले. तर स्वागत खारेपाटण रोटरी क्लब प्रेसिडेंट दयानंद कोकाटे यांनी केले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रशालेच्या शिक्षिका दर्शना पाताडे यांनी केले.

error: Content is protected !!