रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटलं आहे. पोलीस दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरडण्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बेपत्ता आहेत. हा नेमका काय प्रकार आहे? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून विचारला आहे. रिफायनरी विरोधात स्थानिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता अजून उग्र रूप येताना दिसत आहे.
बारसुत आंदोलन पेटलं असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बेपत्ता – संजय राऊत











