श्रद्धा कदम सलग आठव्या वर्षी एमडीआरटी !

कणकवली (प्रतिनिधी) : विमा क्षेत्रात २९ वर्षे कार्यरत असलेल्या कणकवली विमा शाखेच्या आघाडीच्या विमा प्रतिनिधी श्रद्धा एस. कदम यांनी विमा क्षेत्रातील ऑस्कर समजला जाणारा MDRT ( मिलियन डॉलर राउंड टेबल ) हा सन्मान प्राप्त केला असून ह्या वर्षी सिंधुदुर्गातून सलग आठ वर्षे हा पुरस्कार पटकविण्याचा त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. एलआयसीच्या कोल्हापूर विभागातील साडेनऊ हजार एजंट पैकी कदम यांनी हा बहुमान सातत्याने आठ वर्षे पटकवला आहे.

ग्रामीण भागातील सामान्य व्यक्ती हि बचतीकडे ओढली जावी, त्यांना विमा आणि आर्थिक नियोजन उदिस्ट समजून देत विमा व्यवसाय हि जनसेवा म्हणून करत असताना हजारो विमाधारकांच्या विश्वासाहर्ते मुळेच सलग आठ वर्षे हा मानाचा किताब त्या मिळवू शकल्या असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी व्यक्त केली.
कदम यांनी परिश्रम, चिकाटी आणि विश्वासाहर्ताचे जोरावर शहरीभागाबरोबर ग्रामीण भागात त्यांनी आपल्या व्यवसायाची नाळ जोडली आहे. केवळ सिंधुदुर्ग जिल्हयापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी आपल्या विश्वासाहर्तेची छाप महाराष्ट्र,गोवा,कर्नाटकात हि निर्माण केली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल कणकवली विमा शाखेचे शाखाधिकारी दशरथ कुंभार यांनी कदम यांचा सह-कुटुंब सत्कार करून त्यांचे कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले, एलआयचे प्रशासकीय अधिकारी सुनील भोगले, शाखेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!