तळेरे प्रभाग स्तरीय क्रीडा महोत्सवात खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ चे सुयश

६ विद्यार्थ्यांसह लहान गट कबड्डी संघाची तालुकास्तरीय सर्धेसाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने तळेरे येथे घेण्यात आलेल्या बाल, कला, क्रीडा, ज्ञानी मी होणार समूह गान व समूह नृत्य प्रभाग स्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धेत जि. प. प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ च्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात चांगले प्रदर्शन करत सुयश प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

श्री. वामनराव महाडिक विद्यालय तळेरे च्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या क्रीडा महोत्सवात खारेपाटण केंद्र शाळा नं. १ च्या एकूण ६ विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून लहान गट मुलगे कबड्डी संघाने सांघिक यश प्राप्त करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तर या प्रभाग स्तरीय स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – गोळा फेक मोठा गट (मुलगे/मुली) – हेमंत राजू गारगुंडे व वैष्णवी सुरेश कोळसुलकर (प्रथम क्रमांक), लांब उडी मोठा गट (मुलगे/मुली) – सार्थक हर्षल पोरे व अथर्व प्रमोद लाड, तर स्वरा संदीप तोडकर (द्वितीय), उंच उडी लहान गट लहान गट – वैष्णवी स्वप्नील निमणकर (प्रथम) तर हर्ष मंगेश कानडे (द्वितीय), २०० मीटर धावणे मोठा गट मुलगे – अथर्व प्रमोद लाड (प्रथम क्रमांक) या बरोबरच सांघिक खेळात लहान गट मुलगे कबड्डी संघ (प्रथम क्रमांक), खो-खो मोठा गट मुलगे (द्वितीय क्रमांक), कबड्डी मोठा गट मुली (द्वितीय क्रमांक) तसेच समूह नृत्य मोठा गट स्पर्धेत – बिहु या आसामी लोकनृत्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य व शाळा समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांसह खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, संध्या पोरे तसेच खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!