कोटेश्वर मित्रमंडळाच्या वतीने हरकुळ बु. मध्ये १९ ते २१ डिसेंबर दरम्यान क्रिकेट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : श्री कोटेश्वर मित्रमंडळ, कावलेवाडीतर्फे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत हरकुळ बुद्रुक भाटदुकान, कावलेवाडी येथील मैदानावर ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता प्रथम २० हजार रु. व चषक व द्वितीय १२ हजार रु. व चषक अशी बक्षिसे आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, प्रत्येक सामन्यातील सामनावीर अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गणेश पारकर (९५६१४८१४१८), विकास शिरसाट, वैभव शिरसाट, लक्ष्या कुणकेरकर यांच्याकडे संपर्क साधावा.

error: Content is protected !!