कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या; १. रामेश्वर मंदिर ते हुमले्टेंब विकासवाडी रस्ता, २. राजवाडी मुख्यरस्ता ते कानडेवाडी ब्राम्हण देवालय रस्ता, ३. नाटळ खांदारवाडी मुख्य रस्ता ते तावडेवाडी रस्ता अशा विविध कामांचा शुभारंभ माजी जि. प. अध्यक्षा संजना संदेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नाटळ सरपंच सुनिल घाडीगावकर, उपसरपंच पंढरीनाथ तायशेटे, सोसायटी चेअरमन एन. बी. सावंत, ग्रामपंचायत सदस्य दीनानाथ सावंत व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील अंतर्गत रस्त्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सोयीसुविधा वाढणार असून, या कामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.










