मुंबई–गोवा महामार्गावर ट्रक अपघात

मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओरोस येथील राजधानी हॉटेल परिसरात बुधवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने महामार्गावरील सिमेंटच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक थेट दुभाजकावर चढल्याने मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक (MH 12 TV 9189) हा मुंबईकडे माल घेऊन जात असताना राजधानी हॉटेलसमोरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी ट्रक महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर आदळला.

या धडकेमुळे महामार्गावरील पथदिव्याचा खांब कोसळून दुभाजकाची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. अपघाताची तीव्रता पाहता दुर्घटना गंभीर असल्याचे स्पष्ट होते. मात्र, पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक कमी होती आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!