घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 26 जुलै रोजी गुणगौरव

कणकवली (प्रतिनिधी) : क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई या संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे आयोजिले आहे. दिनांक 26 जुलै 2026 रोजी मातोश्री हॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौका नजीक, कणकवली येथे सकाळी 10 वाजता हा गुणगौरव समारंभ होईल. या गुणगौरव समारंभात दहावीच्या परीक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त, बारावी परीक्षेत 60 टक्के पेक्षा जास्त तसेच इतर व्यावसायिक/अव्यवसायिक पदवीधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरवण्यात येईल. शिष्यवृत्तीधारक, विशेष गुणवत्ता अथवा प्राविण्यप्राप्त खेळाडू यांना देखील गौरवण्यात येईल. गुणगौरव समारंभास गुणवंत विद्यार्थी अथवा पालकांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे, ही विनंती. गुणगौरव समारंभासाठी सूर्यकांत घाडी, अध्यक्ष, सिंधुदुर्ग विभाग(9422967374) किंवा प्रदीप घाडी, सचिव, सिंधुदुर्ग विभाग(9757174528) यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन घाडीगांवकर समाज संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य तथा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार विजय गांवकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!