जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी – मंगेश ब्रम्हदंडे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मंगेश वसंत ब्रम्हदंडे यांची तर उपाध्यक्षपदी संध्या हर्षल पोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. खारेपाटण जि.प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची पालक सभा नुकतीच संपन्न झाली. सदर सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व समिती सदस्यांची सन २०२६ ते २०२८ या पुढील दोन वर्षाच्या कालावधी करिता निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी नवनिर्वाचित शाळा समिती अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी केंद्र शाळेचे माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर उपस्थित होते. त्यांनी पालक सभेला मार्गदर्शन केले.

खारेपाटण केंद्र शाळेची नव्याने गठित करण्यात आलेली शाळा व्यवस्थापन समिती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष मंगेश वसंत ब्रम्हदंडे, उपाध्यक्ष – संध्या हर्षल पोरे, सदस्य – संतोष यशवंत पाटणकर, प्राप्ती राजू कट्टी, उमेश धोंडू गुरव, निधी निशिकांत शिंदे, मिथुन मनोहर शेंगाळे, योगिनी आशिष पोमेडकर यासीन अब्बास रमदुल, शिल्पा सागर मेस्त्री, सुहास सुरेश राऊत, श्वेता सचिन माईंणकर, गुरुप्रसाद दीपक शिंदे (शिक्षणतज्ञ), शितीजा गिरीश धुमाळे (स्थानिक प्राधिकरण समिती सदस्य), आरती शंकर जोजन (सचिव तथा मुख्याध्यापक), समीक्षा संतोष राऊत (शिक्षक प्रतिनिधी), आर्वी निलेश करांडे व मानस उमेश गुरव या सर्व नूतन समिती पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका आरती जोजन यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!