कणकवली (प्रतिनिधी) : करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे माजी विद्यार्थी संघ च्या वतीने इयत्ता दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी. जे. कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासावी व समाजकार्यात हिरीहिरीने भाग घ्यावा. विद्यार्थ्यांनी वाचनाची कला जोपासावी असे ते कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष सतीश तवटे, प्रशालेचे मुख्याध्यापक एस. डी. चोडणकर, विद्यामंदिर हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र तवटे, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश तवटे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जे क्षेत्र निवडलेला आहे त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश संपादन करावे यासाठी त्यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी नेहा राणे, गंगाराम परब, संदेश कदम, आकाश कांबळे, जयेश आरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत व आभार मंगेश आरेकर यांनी मानले.













