तरंदळेत तालुका व जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : शिवनेरी क्रीडा मंडळ, तरंदळे यांच्यावतीने तालुका व जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गावाचे माजी सरपंच जयसिंग नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत, सरपंच सुशील कदम, विष्णू सावंत, अंकुश सावंत, सदानंद सावंत, देवा रावले व अमित सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत कळसुली, शिवनेरी संघ, फोंडाघाट, म्हापन, गुरुकुल, चिंदर, मालवण-चिवला, सावंतवाडी, देवगड व ओराेस येथील संघांनी सहभाग घेतला होता.अंतिम सामन्यात मालवण चिवला संघाने विजेतेपद पटकावले, तर म्हापन संघ उपविजेता ठरला. विजेता व उपविजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.तिसरे बक्षीस फोंडाघाट संघाने, तर चौथे बक्षीस शिवनेरी संघाने पटकावले. या संघांनाही रोख बक्षीस व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. वैयक्तिक पुरस्कारांत बेस्ट लिव्हीरो म्हणून दर्शन पाताडे, बेस्ट सेटर म्हणून अखिल सामंत आणि बेस्ट अटॅकर म्हणून बबलु तारी यांना चषक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून श्री. जगदाळे सर, श्री. सातपुते सर व श्री. प्रसन्न यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल शिवनेरी क्रीडा मंडळ तरंदळे तसेच सहकार्य करणाऱ्या हॉलीबॉल प्रेमी या सर्वांचे अमित सावंत यांनी आभार मानले.

error: Content is protected !!