वैभववाडी (प्रतिनिधी) : पाणी आडवा पाणी जिरावा योजनेतर्गत करुळ ग्रामपंचायतच्या वतीने गावात 10 वनराई व कच्चे बंधारे घालण्यात आले आहेत. या सर्व बंधाऱ्यांची वैभववाडी पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले. गुरुवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जामदारवाडी येथे घालण्यात आलेल्या बंधाऱ्याचे उद्घाटन प्रीमेश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.नवीन वर्षाचे स्वागत गावाने नवीन बंधारा घालून केले आहे. या उपक्रमाचेही मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच नरेंद्र कोलते, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, श्री जाधव, मुख्याध्यापक दीपक घाटगे, शिक्षक विलास गुरव, जाधव सर, उपसरपंच भास्कर सावंत, संजय कदम, शिवाजी पवार, राजेंद्र पवार, दत्ताराम पाटील, ग्रामसेवक शशिकांत गुरव व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. दहा बंधारे ग्रामपंचायत करूळ, के सी महाविद्यालय मुंबई, माध्यमिक विद्यालय करूळ, ग्रामसेवक संघटना वैभववाडी यांच्या वतीने घालण्यात आले आहेत. या बंधाऱ्यामुळे गावातील विहिरींच्या तसेच बोरवेलची पाण्याची पातळी वाढली आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा फायदा शेतीसाठी चांगल्या प्रकारे होत आहे. पाळीव जनावरांनाही देखील या बंधाऱ्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे.












