कणकवलीत १८ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सत्यशोधक वक्तृत्व स्पर्धा

वैभववाडी (प्रतिनिधी) : सत्यशोधक समता प्रतिष्ठान, सत्यशोधक शिक्षक सभा आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सत्यशोधक वक्तृत्व स्पर्धा २०२६चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी कणकवली येथे पार पडणार आहे.

स्पर्धेचा विषय
“सामाजिक न्याय आणि भारतीय संविधान”
असा असून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांवरील विचार मांडण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ₹७०००, द्वितीय ₹५०००, तृतीय ₹३००० व उत्तेजनार्थ पारितोषिके अशी रोख रकमेची बक्षीस ठेवण्यात आली आहेत. प्रवेश फी ₹२५० इतकी ठेवण्यात आली आहे.
स्पर्धा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असून वयोमर्यादा १६ ते ३० वर्षे अशी आहे. सहभागी स्पर्धकांनी निर्धारित वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम मान्य करण्यात येणार आहे, तरी या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संतोष पेडणेकर — ८२०८४८४९७७
राहुल कदम — ७२१९४५१८२८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!