सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : बेंगलोर येथील डॉ श्रीनिवास रेड्डी मर्डर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व्यंकटेश बाबू याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. बेंगलोर येथील डॉ रेड्डी यांचा धारदार शस्त्रांनी खून केलेला मृतदेह कणकवली तालुक्यातील साळीस्ते गावात 23 ऑक्टोबर 2025 रोजी सापडला होता. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपहरण तसेच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यव गुन्ह्यातील हवा असलेला मुख्य आरोपी व्यंकटेश बाबू ( रा.चंद्रप्पा बिल्डिंग, नगरशेट्टी हल्ली, बेंगलोर, कर्नाटक ) याने सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपी व्यंकटेश बाबू च्या अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे मांडले. या मर्डर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा व्यंकटेश बाबू असून गुन्हा घडल्यापासून व्यंकटेश बाबू आणि त्याचे तीन साथीदार स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत आहेत, मयत डॉ श्रीनिवास रेड्डी याची आई आणि या गुन्ह्यातील साक्षीदार डॉ श्यामला रेड्डी यांची आरोपी व्यंकटेश बाबू याने बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचा गुन्हा बेंगलोर पोलीस ठाण्यात दाखल असून साक्षीदार डॉ श्यामला रेड्डी याना आरोपीनकडून धमकावण्यात येत आहे.मयत रेड्डी याला आरोपी व्यंकटेश बाबू याने गोवा पणजी येथील हॉटेल क्रिसेंट मध्ये ऑनलाइन रूम बुक करून दिली होती. व स्वतः व्यंकटेश बाबू हा हॉटेल च्या बाजूच्या हॉटेल वरांडा मध्ये मुक्कामी होता.त्यावेळी अन्य कोणते आरोपी उपस्थित होते याचा तपास करणे, मयत रेड्डी आणि साक्षीदार श्यामला रेड्डी यांची मोठी प्रॉपर्टी आहे. त्यांना अन्य वारस नाही, मयत डॉ रेड्डी आणि श्यामला रेड्डी यांच्याकडून आरोपीने कोऱ्या बॉण्ड पेपर वर साह्य घेतल्या असून याचा तपास करणे ,मयत डॉ रेड्डी हा नेहमी स्वतःसोबत आपल्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे आणि लॅपटॉप नेत असे, गुन्हा घडल्यानंतर ही कागदपत्रे आणि लॅपटॉप आरोपी व्यंकटेश बाबू स्वतःसोबत घेऊन गेला असून त्याचा तपास करणे, मयत रेड्डी याचे दोन्ही मोबाईल आरोपी व्यंकटेश बाबू स्वतःसोबत घेऊन गेला असून त्याचा तपास करणे, गुन्ह्यात आरोपीनी वापरलेली अन्य दोन वाहने जप्त करायची आहेत, आरोपी व्यंकटेश बाबू व त्याच्या सहकारी आरोपींनी मयत रेड्डी याची प्रॉपर्टी बळकवण्यासाठी त्याला क्रूरतेने ठार मारले आहे, व्यंकटेश बाबू हा मूळ बेंगलोर कर्नाटक राज्यातील असून तो तपासकामी सहकार्य करणार नाही आदी मुद्दे मांडत सरकारी वकील देसाई यांनी आरोपी व्यंकटेश बाबू चा अटकपूर्व जामीन मंजूर करू नये यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी व्यंकटेश बाबू चा अटकपूर्व जामीन फेटाळला.










