सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : मुंबई क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विष्णू महादेव बांदेकर ( आंबोली, अंधेरी मुंबई ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस.देशमुख यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. मुंबई क्राईम ब्रँच चा अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून आरोपी विष्णू बांदेकर याने 85 वर्षीय सेवानिवृत्त असलेले फिर्यादी रघुनाथ जगन्नाथ सवे ( रा. बिरोडकर टेम्ब ) यांची 97 लाख रुपयांची फसवणूक केली होती. ही घटना 18 नोव्हेंबर 2025 रोजी घडली होती. याबाबत 26नोव्हेंबर 2025 रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विष्णू बांदेकर आणि त्याचा सहकारी आरोपी समशेर खान याने मनी londring प्रकरणात फिर्यादी रघुनाथ सवे याना तुमचे नाव असून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे. तसेच 97 लाख रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. घाबरलेल्या सवे यांनी एकूण 97 लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात भरणा केले. आपली फसवणून झाल्याचे समजताच सवे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विष्णू बांदेकर याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्याला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेत युक्तिवाद केला. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधिश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी आरोपी विष्णू बांदेकर चा जामीन अर्ज नामंजूर केला.












