आता कृपा करून ,शिका.. नाही तर मागा, भिका – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा चे वरिष्ठ नेता कृपाशंकर सिंह हे भाईंदर येथील उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यक्रमात आता मीरा भाईंदर येथे उत्तर भारतीय महापौर बसवणार अशी दरपाेक्ती करतात.आणि त्यावर मल्लिनाथी म्हणून अमित साटम केवळ उद्धव साहेबांवर मुस्लिम मतांचा ओघ आहे.या कारणा वर दात ठेवून “मुंबईत खान महापौर होणार “अशी हिंदू समाजाला फितवण्यासाठी मल्लिनाथी करतात! तेव्हा,मात्र गडकरी साहेब म्हणतात ते खरे वाटते की,”आता यांना विकासाचे मुद्दे बोलता येत नाहीं म्हणून मतदारांना भरकटवण्यासाठी असे पक्ष जाती धर्म याचा आधार घेतात”. आता मात्र सर्वांनी खरच विचार करण्यासारखी परिस्थिती आहे.की, उत्तर प्रदेश असो, का गुजरात,बिहार,राजस्थान, तामिळनाडू, एकतरी राज्यात मराठी महापौर आहे का? जाऊदे साधा नगरसेवक असेल तरी त्याला यावर्षीचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार द्यायला हरकत नाही. नाहीतर आता मराठी रत्ना नी कृपाच्या भाष्याला ठाकरे ब्रँड ची धुपाची आरती दाखवण्याची गरज आहे.हे लक्षात ठेवा.

error: Content is protected !!