कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील गायरान जमिनीवर 2021 रोजी रिंगण सोहळा करण्यास परवानगी नाकारली म्हणून केलेल्या निषेध आंदोलन प्रकरणात आमदार चंद्रदीप नरके आणि सर्व वारकरी व ग्रामस्थांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबद्दल न्यायालयाचे नरके यांनी मनापासून आभार मानले. वारकरी संप्रदायाच्या परंपरा, एकादशीचा रिंगण सोहळा आणि ग्रामस्थांचे हक्क जपण्यासाठी मी जनतेसोबत उभे राहत ठाम भूमिका घेतली होती.
सत्याच्या आणि न्यायाच्या या लढ्यात अखेर न्यायालयाने योग्य निर्णय देत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला आहे. लोकभावना, श्रद्धा आणि लोकशाही मूल्यांसाठी झगडणारे नेतृत्व कधीच चुकीचे ठरत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी माझ्यासोबत लढणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन व आभार मानले












