मसुरकर किनई रोडवर गटार स्वच्छता आणि गवत सफाई
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत च्या प्रभाग 10 मधील भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी आपल्या नूतन वर्षाची सुरुवात जनसेवेतून केली आहे. प्रभाग 10 मधील मसुरकर किनई रोड च्या दुतर्फा उगवलेले गवत आणि गटार सफाई करण्याची मागणी स्थानिक जनतेतून होत होती. जनतेच्या मागणीची तात्काळ दखल घेत नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी नगरपंचायत प्रशासनाला तात्काळ सूचना देत मसुरकर किनई सफाई च्या सूचना केल्या. नगरसेविका आर्या राणे यांनी स्वतः उपस्थित राहून मसुरकर किनई रोडलगत उगवलेले गवत कर्मचाऱ्यांकडून ग्रास कटर ने कापून घेतले. तसेच गटारातील कचरा सफाई करून घेत मसुरकर किनई रोड परिसर स्वच्छ केला. नगरसेविका आर्या राणे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल स्थानिक जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.












