खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे आज सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ यांचा ४२८ वा जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांचे स्वराज्य निर्मितीमध्ये असलेले योगदान आपल्या सर्वांना प्रेरणादायी असेच आहे तर स्वामी विवेकानंद हे संपूर्ण देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान होते. म्हणून त्यांचा जयंती दिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असल्याचे भावपूर्ण उद्गार केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देखील सुंदर भाषणे सादर केली. या जयंती कार्यक्रमाला शाळेचे पदवीधर शिक्षिक मिलिंद सरकटे, शीतल राठोड, सहायक शिक्षिका आरती जोजेन, समिधा राऊत, दीपिका चव्हाण, शिवलीला निडसोसी, श्रीम. चौधरी, अबिदा काझी आदी शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.












