‘पिरॅमल स्वास्थ्य’ संस्थेच्या वतीने खारेपाटण पंचशील नगर अंगणवाडी येथे आरोग्य तपासणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या व समाजात काम करणाऱ्या ‘पिरॅमल स्वास्थ्य’ या संस्थेच्या वतीने आज सोमवार दि.१२ जानेवारी, २०२६ रोजी खारेपाटण पंचशील नगर येथील अंगणवाडी केंद्रात येथील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

जिल्हा रुग्णालय ओरोस सिंधुदुर्ग व तालुका रुग्णालय कणकवली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने घेण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, ‘पिरॅमल स्वास्थ्य’ या संस्थेचे आरोग्य कर्मचारी स्वप्नील ईसवलकर, आरोग्य सेविका साक्षी मांजरेकर, काजल रावराणे, सहायक मृणाली सुतार तसेच खारेपाटण पंचशील नगर अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका सविता पाटणकर, मदतनीस सुनीता पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘पिरॅमल स्वास्थ्य’ या संस्थेचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांचा रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणी मोफत करण्यात आली. यावेळी खारेपाटण येथील अनेक नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

error: Content is protected !!