राज्यातील जि. प. व पं. स. निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घ्या

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दिलासा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलासा देत १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेत १० फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली होती. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपयंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता महानगर पालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावरच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यात स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी वेगाने सुरू होणार आहे.

error: Content is protected !!